थिंपू : जगभरात पर्यावरणाला सर्वात जास्त महत्व देणारा देश भूतान आहे. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी काही दिवसांपूर्वी आपला 40 वा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला. त्यांनी देशवासियांना अपील केली की, त्यांना कोणत्याही प्रकारची भेटवस्तू देऊ नये. त्यांच्या वाढदिवशी प्रत्येक व्यक्तीने एक रोप लावावे किंवा एखादा प्राणी दत्तक घेऊन त्याचा सांभाळ करावा. आपल्या घराच्या आसपास रिकाम्या जागी आणि शेजारच्यांच्या घराजवळ स्वच्छता करण्याची प्रतिज्ञा घ्यावी. हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठे गिफ्ट आणि सन्मान असेल. या छोट्याश्या राष्ट्राच्या राजांनी अपील केल्यावर प्रजेनेदेखील त्यांची इच्छा पूर्ण करण्याची प्रतिज्ञा केली.
भूतान राजांच्या या अपीलनंतर जगभरात पर्यावरनासाठी जागरुकता वाढवण्याबद्दल नवा वाद सुरु झाला आहे. हे पहिल्यांदा झालेले नाही की, राजांनी प्रजेला रोपे लावणे आणि लावलेल्या झाडांना वाचवण्याची अपील केली होती. 2016 मध्ये जेव्हा त्यांच्या मुलाचा पहिला वाढदिवस होता, तेव्हाही त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने जनतेला अपील केली होती की, प्रत्येक घरामध्ये एक रोप लावावे. यानंतर संपूर्ण भूतानमध्ये 108,000 पेक्षा जास्त जास्त रोपे लावली गेली जी आता झाडे बनत आहेत.
रोप लावणाऱ्यानेच त्याची काळजी घ्यावी...
राजे हेदेखील म्हणाले की, ज्या व्यक्तीने रोप लावले, त्यानेच वैयक्तिकपणे त्याची काळजी घ्यावी, जोपर्यंत ते एक छोटे झाड बनत नाही. याव्यतिरिक्त आपल्या शेजारी कचऱ्याची व्यवस्था लावण्याचेही उपाय करावे. याप्रमाणे वैयक्तिक वचनबद्धता हेच त्यांच्यासाठी सर्वात चांगले गिफ्ट असेल.
राजांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी लहान मुलांनी घेतला संकल्प...
राजधानी थिम्पूमध्ये झालेल्या या कार्यक्रमात विशेषतः शालेय मुलांनी संकल्प घेतला. राजांच्या तिन्ही इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्वात पुढे मुलेच राहिली. समारोहामध्ये पंतप्रधान डॉ. लोटे त्शेरिंग यांनी मुलांना संबोधित करत सांगितले की, हे राष्ट्र नैसर्गिक संपत्तीनेच श्रीमंत बनते. देशाची अर्थव्यवस्था, आरोग्य, शिक्षण आणि उद्योगांसाठी पर्यावरण स्वच्छ असणे खूप गरजेचे आहे. राजमहालात या वसंत ऋतूमध्ये दुसऱ्या बाळाचे आगमन होणार आहे. राजांची इच्छा आहे की, त्याच्या आगमनापूर्वी संपूर्ण राष्ट्र नव्या झाडे झुडपांनी सजलेले असावे